धोरणे आणि अस्वीकार

हायपरलिंकिंग बाबतचे धोरण

बाह्य संकेतस्थळे / पोर्टल्सशी असलेल्या जोडण्या
या पोर्टलवर अनेक ठिकाणी तुम्हाला अन्य संकेतस्थळांच्या / पोर्टलच्या इतर शासकीय, अशासकीय / खाजगी संस्थांनी निर्माण व परिरक्षित केलेल्या जोडण्या आढळून येतील. या जोडण्या तुमच्या सोईसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जोडणीची निवड केल्यावर तुम्ही त्या संकेतस्थळामध्ये संचार करू शकता. त्याचक्षणी या संकेतस्थळावर तुम्ही या संकेतस्थळाच्या मालकाच्या / पुरस्कर्त्याच्या गोपनीयता आणि सुरक्षेच्या धोरणांच्या अधीन असाल. जोडणीवरील संकेतस्थळाच्या मजकूरासाठी आणि विश्वसनीयतेबाबत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र जबाबदार असणार नाही आणि त्यामधील हेतुबाबत अनावश्यक पुष्टीही देणार नाही. केवळ ही जोडणी असण्याबाबतचे किंवा या पोर्टलवरील यादीमधील तिचा समावेश हा कोणत्याही प्रकारच्या पृष्ठांकनासाठी गृहित धरला जाऊ नये.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, संकेतस्थळाशी इतर संकेतस्थळे / पोर्टल्स याद्वारे असलेल्या जोडण्या
आमच्या स्थळावर आयोजित केलेली माहिती तुम्ही थेट जोडणीद्वारे घेण्याविषयी आमची कोणतीही हरकत नाही आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या स्थळावरील चौकटींमध्ये आमची पृष्ठे भरण्यासाठी आम्ही अनुमती देऊ शकत नाही. आमच्या विभागाची पृष्ठे ही केवळ वापरकर्त्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या ब्राऊझरच्या चौकटीमध्येच भरली पाहिजेत.

गोपनीयता धोरण

सर्वसाधारण नियमानुसार, हे पोर्टल तुमच्याकडून (जसे की, नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-टपालाचा पत्ता) अशी कोणतीही विनिर्दिष्ट वैयक्तिक माहिती आपोआप ग्रहण करू शकत नाही, ज्याद्वारे तुमची स्वतंत्रपणे ओळख पटविण्याची आम्हाला मुभा मिळू शकेल. हे पोर्टल तुमच्या भेटीचा अभिलेख ठेवते आणि सांख्यिकी प्रयोजनासाठी पुढील माहितीची जसे की, आंतरजाल नियमावली (आयपी) पत्ते, अधिक्षेत्राचे नाव, ब्राऊझरचा प्रकार, कार्यप्रणाली, भेट दिल्याची तारीख व वेळ आणि भेट दिलेली पृष्ठे यांची नोंद करते. या स्थळाला हानी पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा तपास लागेपर्यंत आमच्या स्थळाला भेट देणाऱ्यांची स्वतंत्रपणे ओळख पटविण्यासाठी या पत्त्यांशी संधान साधण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही. कायदे अंमलबजावणी अभिकरणाचा सेवा प्रदात्याच्या नोंदी तपासण्याबाबतचा लेखी आदेश असल्याशिवाय, वापरकर्त्याची किंवा त्याच्या ब्राऊझिंग क्रियांची ओळख आम्ही पटविणार नाही. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र संकेतस्थळाने तुमच्याकडे वैयक्तिक माहिती पुरविण्याची विनंती केल्यास आणि तुम्ही ती देणे पसंत केल्यास ते कसे वापरावे याची माहिती तुम्हाला दिली जाईल आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी सुरक्षा प्रमाणके आचरली जातील.

स्वामित्व हक्क धोरण

या पोर्टलवरील वैशिष्ट्यपूर्ण साहित्य विनाशुल्काने, कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमात विनिर्दिष्ट परवानगीच्या आवश्यकतेशिवाय उद्धृत करता येईल. साहित्य अचूकपणे उद्धृत करण्यावर आणि अप्रतिष्ठाकारक रितीचा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भाचा वापर न करण्यावर हे अवलंबून आहे. जेथे साहित्य प्रकाशित करावयाचे असेल किंवा इतरांना निर्गमित करावयाचे असेल तेथे स्त्रोतास ठळकपणे आभिस्वीकृत करणे आवश्यक आहे. तथापि त्रयस्थाचा स्वामित्व हक्क असलेले साहित्य अशी या स्थळावर ओळख पटविण्यात आलेल्या अशा कोणत्याही साहित्याच्या उद्धृतीकरणाचे प्राधिकारपत्र संबंधित स्वामित्व हक्क धारण करणाऱ्याकडून प्राप्त करण्यात यावे.

अटी आणि शर्ती

या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल स्वामित्व हक्क शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र विभागाकडे केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन "शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ", या जोडण्या उपलब्ध करून देत आहे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.

धोरणे

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

मजकूर लेखन, नियमन आणि मंजुरी धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

वेब मजकूर आढावा धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

मजकूर पुराभिलेख संबंधी धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

संकेतस्थळ सुरक्षा धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

संकेतस्थळ संनियंत्रण धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

आकस्मिकता व्यवस्थापन

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन